लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात गेल्या 24 तासांत 115 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आता एकूण 342 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 143 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 51 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 49 कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या 293 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.
मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 143 कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वडाळा पोलिस ठाण्यात एकाच दिवसात 9 पोलिसांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यापूर्वी जुहू, वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. रफी किडावाई मार्ग वसाहतीतील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे भायखळा येथे देखील एका पोलिसासा कोरोनाची बाधा झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत रुग्ण सापडलेल्या पोलिस वसाहतीतील काही इमारतीही सील करण्यात आल्या होत्या.
राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 171 प्रकरण घडली असून त्यात 657 नागरीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावमध्ये नुकताच काही नागरीकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. मुंबईतील गोवंडी येथेही पोलिसांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.