देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्यातल्या त्यात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत मुंबईत कोरोनाचा आकडा २५ हजाराच्या वर गेला आहे. या सर्व परिस्थितीत डॉक्टर, पोलिस आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्त्यव बजावत आहेत. आपलं कर्त्यव बजावताना आतापर्यंत महाराष्ट्रात १७ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. आता पहिल्या महिला पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
गुरुवारी देखील एका महिला पोलिसाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. प्रतिभा गवळी असं या महिला पोलिस नाव असून त्या ४५ वर्षांच्या होत्या. ठाण्यातल्या श्रीनगर पो.ठा इथल्या पोलिस चौकीत त्या तैनात होत्या. ठाणे सिटी पोलीस या ट्विटर हँडलवरून ही माहिती समोर आली आहे.
कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की, श्रीनगर पो.ठा येथील पोलीस शिपाई श्रीमती प्रतिभा गवळी, वय ४५ वर्षे यांचे कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
— Thane City Police (@ThaneCityPolice) May 21, 2020
ठाणे शहर पोलीस त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. आमच्या सद्भावना नेहमीच त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतील. pic.twitter.com/6JlgXXwXSs
महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे इथले तर दोन मुंबईतील आहेत.
मुंबई पोलिसामधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसंच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही अधिकारी 'हाय-रिस्क एज-ग्रुप'मध्ये होते. त्यामुळे दोघे एप्रिलपासून रजेवर होते.
हेही वाचा