लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 67 टक्क्यांनी घटले


लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 67 टक्क्यांनी घटले
SHARES
मुंबई सारख्या शहरात ऐरवी भूरट्या चोरांची काही कमी नाही. माञ सध्या कोरोनामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. ओसाड रस्ते, घराबाहेर न पडणारे नागरिक आणि रस्त्यावर वाढलेला पोलिसांचा वावर यामुळे मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण चक्क 67 टक्क्यांनी घटल्याचे पोलिसांच्या आकडवारीतून समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्यात मुंबईत एकूण 1हजार 100  गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्यावर्षी म्हणजे मार्च 2019 मध्ये  याच महिन्यात3 हजार 368 गुन्हे नोंदविण्यात आले होते. कोरोनाचा धसका सध्या गुन्हेगारांनी देखील घेतला आहे. अनेक गुन्हेगारनी मुंबई सोडली आहे, तर अनेक गुन्हेगार घरांतुन बाहेर देखील पडत नाहीत. गेल्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात  1 हजार 100 प्रकरणांमध्ये बहुतांश घटनांमध्ये कलम 188 चे उल्लंघन करण्याची प्रकरणे आहेत म्हणजे लॉकडाऊनचे उल्लंघन यासारखे गुन्हे आहेत. 2019 मध्ये एकूण41 हजार 933  गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील बहुतांश चोरीचे होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात एकूण 484 चोरीच्या घटना नोंदविले गेले. परंतु यावर्षी मार्च महिन्यात ही प्रकरणे जवळजवळ शून्य आहेत. चोराना चोरण्यासाठी गर्दीची जागा लागते, गर्दीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स, बॅग सारखी चोरी करणे सोपे असते. परंतु लॉकडाऊनमुळे गर्दी नाही ज्यामुळे चोरी करणे शक्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर घरफोडीची प्रकरणे अधिक असतात. मात्र लॉकडाऊनमुळे नागरीक आपल्या घरात आहेत आणि अशा परिस्थितीत चोरांना चोरी करणे शक्य होत नाही. मार्च महिन्याआधी स्ट्रीट क्राईम म्हणजे चैन स्नॅचिंग, रस्त्यावरील भांडणे, खून, चोरी, अपघात इत्यादी अनेक घटना नोंदवल्या गेल्याआहेत. मात्र सध्या नागरीकच रस्त्यावर येत नसल्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीत मोठी घट असल्याचे निदर्शनास आले आहे.

 लाॅकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस सध्या कठोर कारवाई करीत आहेत.त्यामुळे घटलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण पोलिसांना देखील कोरोना लॉकडाऊनमध्ये मोठी मदत मिळत आहे, तर छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अटक देखील पुढे ढकलत आहेत. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रकरणां व्यतिरिक्त नागरीकांच्या जामिनाला विरोध ही करीत नसल्याचे चित्र आहे. एकूणच मुंबईसारख्या महानगरात रोजच्या गर्दीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे बाहेर गर्दी नाही तसेच नागरीक आपापल्या घरात असल्याने  चो-यांचं प्रमाण देखील नगण्य आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी 65 टक्क्यांपर्यंत घटल्याचे एका पोलीस अधिका-याने सांगितले.

मार्च मधील आकडेवारी
                        दाखल गुन्हे      अटक आरोपी
चैन स्नँचिंग            55                      47
घरफोडी                110                     33
फसवणूक              301                    81
खंडणी                   13                     9
हत्या                      12                     10


फेब्रुवारीतील आकडेवारी
                  दाखल गुन्हे       अटक आरोपी
चैन स्नँचिंग         80                   59
घरफोडी            142                   46
फसवणूक          483                 102
खंडणी               37                    31
हत्या                  20                   18


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा