कुख्यात गुंड छोटा शकील आणि डी कंपनीचा शार्प शूटरला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मोठ्या शिताफिने अंधेरी लोखंडवाला परिसरातून अटक केली आहे. कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय (२९) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, जिवे मारण्याची धमकी, फसवणूक या सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून मागील ३ वर्षांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.
हेही वाचाः- बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!
९० च्या दशकात छोटा राजन टोळीत शार्प शूटर म्हणून कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय हा कार्यरत होता. राजनसोबत पैशांवरून वाद झाल्यानंतर त्याने छोटा शकिलसोबत काम करण्यास सुरूवात केली शकिलच्या सांगण्यावरून कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजयने अनेकांवर जिवघेणे हल्ले केले, तर खंडणीसाठी अनेकांना धमकावले. त्याच्यावर मुंबईतच २४ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दरम्यान शकिलच्या सांगण्यावरून तो केनियाला गेला असताना. त्यांच्यावर टोळी युद्धातून हल्ला झाला होता. यानंतर शकिलपासून तो हातभर अंतर ठेवून होता. पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी तो वारंवार आपली नाव बदलून वावरायचा.
हेही वाचाः- खोट्या अभिरुचीचा खोटा आधार : टीआरपी!
या दरम्यान आॅस्ट्रेलिया, दुबईच्या वारंवार फेऱ्या करायचा. तर नेपाळ मार्गे भारतात येऊन पंजाबमध्ये लपून बसायचा. मुंबईत एका व्यावसायिकाला त्याने नुकताच ९ कोटींना चुना लावला. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाला त्या व्यावसायिकाने तक्रार नोंदवली होती. कुलविंदरसिंग बैन्स उर्फ जिम्मी बेंस उर्फ अजय हा अंधेरीत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला १३ आँक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.