झायरा वासिम विनयभंग प्रकरण : विकास सचदेवला न्यायालयीन कोठडी

विकासच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूच्या वाकिलांचा युक्तिवाद एेकल्यानंतर कोर्टाने विकासला पोलिस कोठडी न सुनावता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

झायरा वासिम विनयभंग प्रकरण : विकास सचदेवला न्यायालयीन कोठडी
SHARES

झायरा वासिम विनायभंगाप्रकरणी बुधवारी आरोपी विकास सचदेवला दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी विकासच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूच्या वाकिलांचा युक्तिवाद एेकल्यानंतर कोर्टाने विकासला पोलिस कोठडी न सुनावता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. कोर्टाने न्यालायीन कोठडी सुनावताच विकास सचदेवच्या वकिलांनी जामिनाचा अर्ज केला असून त्यावर 15 तारखेला सुनावाणी ठेवण्यात आली आहे.


पोलिसांनी मागितली होती पोलीस कोठडी

आरोपीची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विकास सचदेवची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्याचबरोबर झायरा वासिमचा महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर जाबाब नोंदवून घ्यायचा असल्याचं पोलिसांनी यावेळी कोर्टात सांगितलं. विकास सचदेवच्या वाकिलांनी मात्र पोलिस कोठडी वाढवून देण्यास विरोध केला होता.


सचदेवला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलं

झायरा वासिमचा सीआरपीसी 164 अंतर्गत कबुली जाबाब घेण्याचं पोलिसांनी संगितलं. मात्र, सध्या झायरा वासिम ही जम्मू काश्मीर येथे असून तिथे सीआरपी लागू होत नसल्याचं यावेळी विकासच्या वाकिलांनी कोर्टात सांगितलं

विकास सचदेवला त्याच्या घरातून 1 वाजून 10 मिनिटांनी ताब्यात घेण्यात आलं. मात्र, सगळ्या कागदपत्रांवर रात्री साडेनउची वेळ टाकण्यात आली आहे. यावेळी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज देखील कोर्टात सादर करण्यात आलं.


पोलिस तक्रार उशीरा का?

10 तासांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, याकडेदेखील वाकिलांनी लक्ष वेधलं. विमानतळावरील पोलिस ठाण्यात झायराने तक्रार करण्यास नकार दिला होता. तक्रारदार महिलेचा मॅनेजर हा प्रसार मध्यमांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात असून त्यांना माहिती देत होता. मग पोलिसांत का उशिरा कळवण्यात आलं? याकडे देखील सचदेवच्या वाकिलांनी लक्ष वेधलं.



हेही वाचा

'दंगल' फेम झायरा वसिमसोबत विमानात छेडछाड


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा