बनावट नोटांचा वापर करणाऱ्या दोघांना अटक


बनावट नोटांचा वापर करणाऱ्या दोघांना अटक
SHARES

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल स्थानकात मंगळवार १९ जून रोजी भागलपूर बिहार येथे जाण्यासाठी तिकिटांचं बुकिंग करताना दोन व्यक्तीनी बनावट नोटांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभु कुमार कैलाश मंडल (१९) आणि बलराम अनिरूद्ध मंडल (२८) असं या अरोपींची नावं आहेत. या दोघांनी तिकीट बुकिंग करण्याकरता १०० रुपयांच्या बनावट नोटांचा वापर केला आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रभु कुमार कैलाश मंडल याच्याकडून ९ हजार ४०० रुपयांच्या आणि बलराम अनिरूद्ध मंडल याच्याकडून १२ हजार ६०० असं एकूण २२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.


गुन्हा दाखल

वापरात असलेल्या नोटा बनावट असल्याचं माहीत असताना देखील त्यांचा वापर केल्याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी या दोघांनविरोधात कलम ४८९-ब, ४८९-क, ३४ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा