सेलिब्रिटीच्या 18 वर्षीय मुलाचा कार अपघातात मृत्यू

जलज धीर हा बीबीएचा विद्यार्थी होता आणि तो त्याच्या वडिलांसोबत गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये सहभागी होण्यासाठी जात होता.

सेलिब्रिटीच्या 18 वर्षीय मुलाचा कार अपघातात मृत्यू
SHARES

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच 'सन ऑफ सरदार' चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांना पुत्रशोक झाला आहे. त्यांचा 18 वर्षांचा मुलगा जलाज धीर याचा रस्ते अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे.

दुभाजकाला धडक 

मुंबईमध्ये 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या जलाजचा मृत्यू झाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर विले-पार्लेमध्ये जलाज आणि त्याचे मित्र प्रवास करत असलेली भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मद्यधुंदवस्थेत कार चालवत असल्याचा संशय

जलाज हा रात्री उशीरा त्याच्या मित्रांबरोबर वांद्रे येथून गोरेगावला जात होता. यापैकी 18 वर्षीय साहिल मेंदा नावाच्या त्याचा मित्र कार चालवत होता. साहिल हा मद्यधुंदवस्थेत कार चालवत होता अशी चर्चा आहे. सहारा स्टार हॉटेलजवळ साहिलचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट सर्व्हिस रोड आणि ब्रिजदरम्यान असलेल्या दुभाजकाला धडकली.

आरोपी ताब्यात

या अपघातामध्ये जलाज आणि त्याचा सार्थ कौशिक नावाचा 18 वर्षीय मित्र मरण पावला. या दोघांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणामध्ये अपघातग्रस्त कारमध्ये असलेल्या जेडन जिमी नावाच्या 18 वर्षीय तरुणाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साहिलविरुद्ध तक्रार दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना साहिलच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी गोळा केले असून आता त्याच्या रक्तामध्ये मद्याचा अंश आहे की नाही याच्या पडताळणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.



हेही वाचा

ठाणे : अंबरनाथ येथे मृत अर्भक सापडले

4th सीटच्या वादातून 16 वर्षीय तरुणाकडून हत्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा