नवघरमध्ये आढळला अर्धवट जाळालेला मृतदेह, परिसरात खळबळ

नवघर परिसरात सोमवारी सायंकाळी एक अर्धवट जाळालेला मृतदेह आढळला आहे. पूर्णत नग्नावस्थेत आणि अर्धवट जळलेला असाहा मृतदेह होता. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जाळून विद्रुप करण्यता आला होता. असा हा मृतदेह आढळल्यानं या परिसरात खळबळ उडाली आहे.

नवघरमध्ये आढळला अर्धवट जाळालेला मृतदेह, परिसरात खळबळ
SHARES

नवघर परिसरात सोमवारी सायंकाळी एक अर्धवट जाळालेला मृतदेह आढळला आहे. पूर्णत नग्नावस्थेत आणि अर्धवट जळलेला असाहा मृतदेह होता. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जाळून विद्रुप करण्यता आला होता. असा हा मृतदेह आढळल्यानं या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

सोमवारी सायंकाळी मुलुंडच्या टाटा नगर स्मशाननभूमीच्या पाठीमागे एक अनोळखी मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचा माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. केळकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणारे दिलीप पवार लॅबमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांचं लक्ष काही कुत्र्यांकडे गेलं. हे कुत्रे कुणाभोवती फिरत आहेत हे लक्ष देऊन पाहिल्यानंतर पवार यांना मृतदेह त्या ठिकाणी पडला असून त्याभोवती कुत्री फिरत असल्याचं दिसलं. त्याबरोबर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क करत यासंबंधीची माहिती दिली. माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


मृतदेहाचा चेहरा विद्रुप

नग्नावस्थेत असलेला हा मृतदेह अर्धवट जळालेला होता. त्यातही चेहरा पूर्णपणे जाळून विद्रुप करण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप करत मृतदेहाच्या अंगावरचे कपडेही काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. केमिकल्सचा वापर करत चेहरा विद्रुप करण्यात आल्याचं यावेळी समोर आलं आहे. तर मृतदेहाच्या छातीवर अनेक जखमाही आढळून आल्या आहेत.


पोलिस तपास सुरू

दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरातील मिसिंग तक्रारींची तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व सीसीटिव्ही ही तपासण्यात येत आहेत. या प्रकरणी नवघर पोलिसात ३०२ भा.द.वी कलमानुसार हत्येचा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी गुन्हे शाखा ७ चे पोलिस संयुक्तरित्या तपास करत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.



हेही वाचा -

लग्नासाठी तरूणीवर बळजबरी करणारा अटकेत

आणखी दोन संशयित दहशतवादी एसटीएसच्या जाळ्यात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा