अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही - अनिल देशमुख


अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही - अनिल देशमुख
SHARES

 महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीचा हाहाकार पसरवला असताना, सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक समाजकंटक अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांची गय करू नका असेे आदेश गृहमंञ्यांनी सायबर विशेष महानिरीक्षकांना दिले आहेत.

राज्यात सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला आहे. राज्यभरात अशा समाजकंटकांवर तब्बल 132 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. तीन  दिवसात सायबर पोलिसांनी राज्यातील विविधपोलिस ठाण्यात नवीन 19 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये बीड 16, कोल्हापूर 13,पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, जालना 8, सातारा 7, जळगाव 7, नाशिक ग्रामीण 6, नागपूर शहर 4, नाशिक शहर 5, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3, रत्नागिरी 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, उस्मानाबाद 1,हिंगोली 1यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

    या सर्व गुन्ह्यांत व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 79 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी 3गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर  द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत व  त्यामध्ये आतापर्यंत 35 आरोपींना अटक केली असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

  सतर्कता बाळगावी

सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे . कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो . 

सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी .


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा