राज्याच्या प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असलेले अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मन्मथ म्हैसकर (22) असे मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान मलबार हिलमधील दर्या महल नेपसीन रोड येथील इमारतीवरून उडी घेत त्याने आत्महत्या केली. मन्मथ मरीन लाइन्सच्या ब्लू हेवन अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. सकाळी 7 वाजता मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मलबार हिलच्या नेपसीन रोड येथील एका इमारतीवरून एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मलबार हिल पोलिसांनी एडीआर क्रमांक 22/17 अन्वये या घटनेची नोंद केली आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष असलेल्या मिलिंद म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांचा तो एकुलता एक मुलगा होता.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)