मुलुंडमध्ये नाकाबंदी दरम्यान 47 लाखांची रोकड जप्त

मुलुंड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मुलुंडमधील बीआर रोड परिसराची नाकेबंदी केली होती

मुलुंडमध्ये नाकाबंदी दरम्यान 47 लाखांची रोकड जप्त
SHARES

मुंबईत सध्या नाकाबंदीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड मिळत आहे. गुरुवारी मुलुंड परिसरात एका कारमधून पोलिसांनी 47 लाखांची रोकड जप्त केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सर्व हद्दीत नाकाबंदी करत आहेत. मुलुंड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मुलुंडमधील बीआर रोड परिसराची नाकेबंदी केली होती.

यावेळी एक कार तेथे आली. संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवली. कारची तपासणी केली असता त्यात 47 लाखांची रोकड पोलिसांना आढळली.

पोलिसांनी रक्कम, कार आणि चालकाचा ताबा घेतला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा

सोशल मीडियावरील मैत्रीमुळे मुंबईत महिलेची आत्महत्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा