पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू?


पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू?
SHARES

कांदिवली - रस्त्याच्या किनारी दारू पित बसलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  उत्तम खैतापूर असे या व्यक्तीचे नाव आहे. उत्तम हे कांदिवलीच्या दामूनगर येथील रहिवासी असून शुक्रवारी मित्रांसोबत रस्त्याच्या किनारी दारू पित बसले होते. त्यावेळी तपासणीसाठी बाईकरून आलेल्या दोन पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये उत्तम खैतापूर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी वारंवार डोक्यावर मारल्याने उत्तम यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान यामध्ये सदर पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे कांदिवली पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा