टिटवाळा (titwala) पोलिसांनी सासू, सासरा, दीर आणि पतीविरुद्ध हुंड्यासाठी सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 लाख रुपये (dowry) न दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या लोकांकडून विवाहीतेचा (married woman) छळ (torture) केला जात होता.
आरती केतन भांगरे (25) असे मृताचे नाव आहे. ती टिटवाळा येथील हरी ओम व्हॅली फेज 2 या इमारतीत सासरच्यांसोबत राहत होती. पोलिसांनी सासरा दिनकर काशिनाथ भांगरे, सासू लतिका दिनकर भांगरे, पती केतन, दीर गुंजन आणि सून मनीषा गुंजन भांगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकदरा गावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ जनार्दन घारे यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. इगतपुरीजवळील काळुस्ते गावात घारे कुटुंब राहते.
पोलिसांनी सांगितले की, आरतीचा विवाह केतनसोबत गेल्या वर्षी झाला होता. आरती ही मूळची नाशिकची आहे. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी आरतीला टोमणे मारायला सुरुवात केली.
"लग्नात आम्हाला पैसे दिले गेले नाहीत, आमचा अनादर झाला, तू तुझ्या आई-वडिलांच्या घरून 20 लाख रुपये आणले पाहिजेस, तुला चांगला स्वयंपाक देखील येत नाही', अशाप्रकारे आरतीला रोजचा त्रास दिला जात होता. या छळाला आरती कंटाळली होती.
दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने आरतीने शनिवारी रात्री टिटवाळा येथील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. टिटवाळा पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.
आरतीच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांना कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा