तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरण बंदची हाक

तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी उरण बंदची हाक देण्यात आली होती.

तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरण बंदची हाक
SHARES

उरण इथे 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेनंतर उरणमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी उरण बंदची हाक देण्यात आली होती.  

उरण रेल्वे स्थानकाच्या बाजूच्याच झाडीत तिचा मृतदेह सापडला. तरुणी ऑफिसमधून निघाली पण ती घरी आली नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता तिचा मृतदेह उरण स्टेशनजवळीत झाडीत आढळला.    

दरम्यान, तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधावं म्हणून स्थानिकांनी मोर्चा (protest) काढला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रविवारी 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता फुल मार्केट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळून हा मोर्चा निघाला. या मोर्च्यात शेकडो नागरिक सामील झाले. तसेच महिला या मोर्च्यात मोठ्याप्रमाणावर उपस्थित होत्या.

मृत तरुणीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पोलिसांचं एक पथक कर्नाटकाला (karnataka) गेलं असून आरोपीचा शोध घेत आहेत.



हेही वाचा

उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या, आरोपी फरार

शिळफाटा : सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा