परदेशी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी एका वयोवृद्धाला अटक केली आहे. खलील अहमद शिराद अहमद खान (५९) असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने खान याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
इंग्लडला स्थायिक
मूळची भारतीय असलेली११ वर्षीय मुलगी ही इंग्लडला स्थायिक झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती कुटुंबियांसोबत भारतात फिरायला आली होती. मंगळवारी ती व्ही.पी. रोडवरील तिच्या नातेवाईकांना भेटायला आली होती. त्याच इमारतीत आरोपीचा मोठा भाई तिसऱ्या माळ्यावर राहतो. दुपारच्या सुमारात मुलीचे कुटुंबिय नातेवाईकांसोबत गप्पा मारत असताना ती इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील जिन्यावर होती. त्याच वेळी आरोपी जिन्यावरून भावाच्या घरी जात होता.
गैरवर्तन करून पळाला
एकट्या मुलीला पाहून खान याने मुलीसोबत गैरवर्तन करून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मुलीने कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी व्ही.पी.रोड पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने खान याला अटक केली. खान याने यापूर्वीही असे गैरवर्तन अनेक मुलींसोबत केले आहेत. मात्र या घटना तक्रारदारांनी तक्रार न केल्यामुळे कधी पुढेच आल्या नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
Video: ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या, राज ठाकरेंना आलेल्या ‘ईडी’च्या नोटीशीमुळे उचललं टोकाचं पाऊल?
छायाचित्रकाराची बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधली