नराधमाने केला महिलेवर बलात्कार, पत्नीने काढला व्हिडीओ

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

नराधमाने केला महिलेवर बलात्कार, पत्नीने काढला व्हिडीओ
SHARES

मालवणी येथे 22 वर्षीय महिलेला ड्रग्ज देऊन तिचा अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. या चित्रीकरणातून तरुणीकडून धमकावून खंडणी मागितली जात होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारीनुसार, आरोपी महिलेने पीडितेला तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी तिला शीतपेयातून काही औषध देण्यात आले. तरुणी बेशुद्ध पडताच आरोपी महिलेच्या पतीने तरुणीवर बलात्कार केला आणि आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. तरुणीने तिच्या मित्राला सांगितले, ज्याने तिला या घटनेची पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार तरुणीने मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यान्वये बलात्कार, अंमली पदार्थ देणे, धमकावणे, खंडणी व फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तात्काळ आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या पतीचा शोध सुरू आहे.हेही वाचा

मानखुर्द : नराधमाने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत लपवला

कचरा टाकणे, थुंकणे यासाठी 1,380 गुन्हेगारांना 3 लाखांहून अधिक दंड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा