स्वच्छतागृही असुरक्षीत, वाकोल्यात तरूणीचं अश्लील चित्रीकरण करणारा अटकेत

कोल्यातील सार्वजनिक शौचालयात एक व्यक्ती मोबाईलने तरूणीनं अश्लील चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तक्रारदार तरूणीनं जमावाच्या मदतीने मोठ्या धाडसाने या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. आरोपीचं नाव इंद्रजीत लाखन असं आहे.

स्वच्छतागृही असुरक्षीत, वाकोल्यात तरूणीचं अश्लील चित्रीकरण करणारा अटकेत
SHARES

शहरात महिलासांठी मुळातच सार्वजनिक स्वच्छतागृह मोठी कमतरता आहे. आहेत ती स्वच्छतागृह कमालीची अस्वच्छ आहेत, त्यातच आता वाकोल्यातील एका घटनेने महिलांच्या स्वच्छतागृहातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाकोल्यातील सार्वजनिक शौचालयात एक व्यक्ती मोबाईलने तरूणीनं अश्लील चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तक्रारदार तरूणीनं जमावाच्या मदतीने मोठ्या धाडसाने या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. आरोपीचं नाव इंद्रजीत लाखन असं आहे.


नेमकं काय झालं?

सांताक्रूझच्या वाकोला परिसरात २० वर्षीय पीडित तरूणी रहात असून त्याच परिसरातील धोबीघाटच्या दीपक चाळीत आरोपी इंद्रजीत लाखन राहतो. मागील अनेक दिवसांपासून इंद्रजीतची पीडितेवर वाईट नजर होती. शनिवारी पीडित तरूणी तेथील सार्वजनिक शौचालयात गेली होती. सार्वजनिक शौचालयात कुणीही नसल्याची संधी साधत. बाजूला असलेल्या पुरुषांच्या शौचालच्या भींतीवरून इंद्रजीत मोबाईलच्या सहाय्याने पीडितेचं अश्लील चित्रीकरण करत होता. त्यावेळी पीडित तरूणीच्या अंगावर धूळ पडल्याने तिचं लक्ष वर गेलं. तेव्हा पीडित तरूणीला फटीतून मोबाईल असलेला हात दिसला.


'असा' पकडला आरोपी

तरूणीने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी शौचालयाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा आरोपी पळू लागला. त्यानंतर जमावाने पळ काढत असलेल्या इंद्रजीतचा पाठलाग करून त्याला पकडत चोप दिला आणि वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी इंद्रजीत विरोधात विनयभंगचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. महिला पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये पीडित तरूणीचं अश्लील चित्रीकरण होतं. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन न्यायवैधक प्रयोग शाळेत पाठवला आहे. या प्रकरणात आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.



हेही वाचा-

एटीएम वापरताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा