व्हीपी रोड पोलिस ठाण्यात सागर बेलोसे (32) या विरार (virar) येथील एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्याने खाडिलकर रोड, गिरगाव (girgaon) येथे पत्नी शीतल बेलोसे (30) हिच्या मानेवर कटरने वार (attack) करून नंतर स्वत: आत्महत्या (suicide)करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न झाले होते. मात्र नवऱ्याचे बाहेर अफेअर असल्याची पत्नीला शंका होती आणि त्यामुळे तिने व्हीपी रोड येथील वडिलांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. “ती तिच्या वडिलांच्या घरी आली आणि तिचा पती सागर तिला घरी परत येण्याची विनंती करत होता. मात्र तिने परत येण्यास नकार दिल्याच्या रागातून तिच्यावर हा हल्ला करण्यात आला.
5 ऑगस्ट रोजी गिरगाव परिसरात आरोपीने कटरच्या सहाय्याने तिच्यावर हल्ला केला. आणि त्यानंतर आरोपीने स्वत:वर देखील वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर एक महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
शीतलला तातडीने एचएन रिलायन्स रुग्णालयात तर सागर बेलोसे यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, “दोघांनाही दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असून दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे,” असे पोलिसांनी सांगितले. हे दोघे विरार येथे राहत असून त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. सागरवर बीएनएस कलम 109 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा