दिल्ली (delhi) पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या मदतीने मुंबई (mumbai) पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला अटक केली. राजधानीच्या रेड-लाइट एरियातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बिपुल बिरेन सिक्री हे आरोपीचे नाव असुन त्याच्यावर 12 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार (sexual molestation) आणि हत्या (murder) केल्याचा आरोप आहे.
सिक्रीने मुंबई सोडून दिल्लीत आश्रय घेतला होता. माहिती देणाऱ्याने त्याचा ठावठिकाणा मुंबई पोलिसांना सांगितला. मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार त्याने सिक्रीला दारूचे आमिष दाखवले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिल्लीच्या पोलिसांना सूचित केले आणि दिल्ली पोलिसांनी सिक्रीला दिल्लीत अटक केली.
5 मार्च रोजी वडाळ्याच्या (wadala) खाडीत एका मुलाचा शिर नसलेला मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मुलगा बेपत्ता झाला त्या दिवशी सिक्री त्याच्यासोबत होता. हे समजताच संतप्त झालेल्या स्थानिकांनी सिक्री यांना मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या ताब्यात असताना परिस्थितीचा फायदा घेत सिक्री फरार झाला होता. सिक्री मुळचा कोलकाता येथील आहे. तो एक दलाल होता ज्याने एका सेक्स वर्करशी लग्न केले होते. त्याने पत्नीचा खून केला होता ज्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
साथीच्या आजाराच्या काळात, तुरुंगातील वाढत्या गर्दीमुळे त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला. त्याचा पॅरोल संपल्यानंतर सिक्री मुंबईला पळून आला होता.
हेही वाचा