मटका किंग अशी ओळख असणाऱ्या रतन खत्री (88) यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी सकाळी त्यांचं राहत्या घरी निधन झालं. रतन खत्री यांनी मटका व्यवसायावर गेली अनेक दशके वर्चस्व गाजवलं.
सिंधी परिवारात खत्री यांचा जन्म झाला. पाकिस्तानच्या कराचीमधून रतन खत्री मुंबईत आला. मुंबईत आला तेव्हा रतन खत्री तरूण होते. मटका हा प्रकार लोकप्रिय करण्याच श्रेय रतन खत्रीला जातं. रतन खत्री हे 1960 मध्ये कल्याण भगत यांच्या सोबत मटका व्यवसायात उतरले. त्यानंतर 1964 मध्ये त्यांनी भगत यांच्यापासून दूर होत या व्यवसायात आपली वेगळी वाट धरली. मटका व्यवसायातील हातखंड्यामुळे रतन खत्री यांचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं होतं. रतन खत्री हे गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायात सक्रीय नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून रतन खत्री यांच्या प्रकृती ढासळली होती. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत ते कुटुंबासोबत राहत होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -