दोनशे गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवलं


दोनशे गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवलं
SHARES

नौदल अधिकाऱ्यांना वापरासाठी कार भाड्याने लावून देण्याच्या नावाखाली दोनशेहून अधिक जणांना कोट्यावधी रुपयांना गंडवणाऱ्या महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.


दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांच्या नावावर कार खरेदी करून देण्याचं आमीष दाखवून गंडवलं आहे. हरविंदर कौर ऊर्फ विनी नागपाल असं तिचं नाव आहे. तिच्याविरोधात भादंविसह महाराष्ट्र गुंतवणूकदार ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्याच्या (एमपीआयडी)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुंतवणूकदारांना दाखवलं आमीष

एसएम मोटार्स कंपनीत आरोपी हरविंदर पूर्वी व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. मात्र काही कारणास्तव तिने कंपनी सोडल्यानंतर एटूझेड नावाच्या कंपनीच्या आडून हरविंदरने गुंतवणूकलदारांना दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांच्या नावावर कार खरेदी करून मासीक पर्तावा देण्याचं आमीष दिलं होतं. हरविंदरने तक्रारदाराला महिन्याला नियमित 15 ते 45 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाचं प्रलोभन दाखवले होते.


दोन कोटींना गंडवलं

मात्र गुंतवणूकदारांची संख्या वाढल्यावर त्यांनी पैसे देणे बंद केले. असे आमीष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना हरविंदरने गंडवलं आहे. या दोन्ही कंपन्या नरेश नवले नावाच्या व्यक्तीच्या असून, त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तपास पथकाने आरोपींच्या नवी मुंबईतील दोन फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा अशा दोन कोटींच्या मालमत्तांची माहिती घेतली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा