घाटकोपर - भटवाडीमध्ये एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. अनिल अहिरे या नराधमाने शेजारी राहणाऱ्या मुलीला चॉकलेटच आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीवर बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीला घाबरलेल्या अवस्थेत पाहून आईनं तिच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.