लाचखोर जीएसटी अधिक्षकावर गुन्हा

जानेवारी २०१८ मध्ये शरदचंद्र यांनी एका व्यक्तीकडं ५० हजार रुपये लाच मागितली होती. या प्रकरणी नोव्हेंबर २०१७ मध्ये तक्रारदारानं सीबीआयच्या सहसंचालकाकडं केलेल्या तक्रारीमुळं एकच खळबळ उडाली होती.

लाचखोर जीएसटी अधिक्षकावर गुन्हा
SHARES
उत्पन्नापेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ताजवळ बाळगल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन विभागानं (सीबीआय) जीएसटी अधिक्षकावरच गुन्हा दाखल केला आहे. शरदचंद्र स्वामिनाथन असं या जीएसटी अधिकाऱ्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच शरदचंद्र यांना लाचलुचपत विभागानं ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती.


लाच मागितली

जानेवारी २०१८ मध्ये शरदचंद्र यांनी एका व्यक्तीकडं ५० हजार रुपये लाच मागितली होती. या प्रकरणी नोव्हेंबर २०१७ मध्ये तक्रारदारानं सीबीआयच्या सहसंचालकाकडं केलेल्या तक्रारीमुळं एकच खळबळ उडाली होती. शरदचंद्र यांना लाचलुचपत विभागानं अटक केली होती.


४३ टक्के अधिक मालमत्ता

शरदचंद्र यांच्या चौकशीत उत्पन्नापेक्षा ४३ टक्के अधिक मालमत्ता त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावानं आढळून आली. त्यानुसार, सीबीआयनं त्याच्यासह त्याच्या पत्नीवर अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणी सीबीआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या मुंबई-शिर्डी मार्गावर 'ट्रेन १८' धावणार?

अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लींकचं कंत्राट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा