देशातील प्रसिद्ध टाटा वाहन विमा कंपनीची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला सायबर पोलिसांनी कोलकाताहून अटक केली आहे. पियूशकांती रॉय असं अटक आरोपीचं नाव आहे.
टाटा वाहन विमा सुविधा देणाऱ्या कंपनीची चुकीची माहिती प्रसारित करून कंपनीच्या नावाने चुकीचे मेसेज पसरवले जात होते. यामुळे टाटा वाहन विमा कंपनीचं मोठं नुकसान होत होतं. त्याचबरोबर बदनामीही होत होती. यासर्व प्रकरणाची दखल कंपनीच्या वरिष्ठांनी घेतल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालात दावा केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने याप्रकरणी सायबर पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले.
पोलिस तपासादरम्यान कोलकाता येथून 26 ई-मेल आयडीच्या सहाय्याने हे बदनामीकारक संदेश पाठवण्यात आले होते. त्या पत्त्यावरून रॉय संदेश पाठवत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली, त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.