देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबिर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने परिपञक काढून ही घोषणा केली आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे हे आज निवृत्त झाले. लोकसभा आणि त्या पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणूकीमुळे बर्वे यांना सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली होती.
संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचा पोलिस आयुक्त कोण होणार याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. या पदासाठी परमबीर सिंह यांच्याशिवाय राज्याच्या टेक्निकल विभागाचे प्रमुख हेमंत नगराळे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पुण्याचे पोलिस आयुक्त के वेंकटेशम, सध्या केंद्रात प्रति नियुक्तीवर असलेले सदानंद दाते यासारख्या दहा-बारा अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. माञ अखेर परमबिर सिंह यांचे नाव निश्चित करण्यात आले.ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली. लवकरच परमबिर हे आपला पदभार स्विकारतील.
परमबिर सिंह हे 1988 च्या बँचचे आयपीएस अधिकारी आहे. ठाणे पोलिस आयुक्त असताना. त्यांनी कुख्यात गुंडाच्या मुस्क्या आवळल्या, तर त्या पूर्वी ते एटीएसमध्ये उपप्रमुख होते. परमबिर यांना निवृतीसाठी 4 वर्ष आहे. त्यामुळे ते पुढील 2 वर्ष मुंबई आयुक्तपदावर राहतील.
कोण आहेत परम बीर सिंह?
• परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
• त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केलं.
• लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळलं.
• ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते.
• परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.