प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल


प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल
SHARES
 'दिल तो हैपी है जी' या मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने जानेवारीत मिरा रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. सुरूवातीला सेजलने नैराक्षेतून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. पोलिस तपासात आता सेजलने मिञाच्या सांगण्यावरूनच अंधश्रद्धेला बळी पडत आत्महत्या करत आयुष्य संपवल्याचे आता पुढे आले आहे. याप्रकरणी सेजलच्या आईच्या तक्रारीवरून मिरारोड पोलिासांनी सेजलचा मित्र आदित्य वशिष्ठ उर्फ गुज्जर  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दैवी शक्तीच्या मदतीने प्रमुख भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आदित्यने तिच्याकडून सव्वालाख रुपयेही घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील राहणारी असलेली सेजल मिरा रोडमधील शिवार गार्डन भागात रॉयल नेस्ट इमारतीत तिच्या मैत्रिणीसह राहत होती. 24 जानेवारीमध्ये सेजलच्या आत्महत्येची बातमी समोर आली आणि संपूर्ण टीव्ही जगत हादरले होते. ‘दिल तो हॅपी है जी’ या मालिकेतून सेजल शर्मा प्रकाशझोतात आली होती. 148 भागानंतर ही मालिका 9 ऑगस्ट 2019 रोजी बंद झाली. त्यानंतर सेजल अन्यत्र काम शोधत होती. मात्र, काम मिळू न शकल्याने तिला नैराश्य आले होते.  अशातच तिची ओळख आदीत्यसोबत झाली. आदित्य हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्या आजी मोठी ज्योतिष असून तंत्र मंत्र विद्येत पारंगत असल्याचे त्याने सेजलला सांगितले होते. सेजल हीचे केस गळण्याची समस्या होती त्याचा परिणाम तिच्या व्यावसायिक जीवनावर होत होता. त्यावेळी आदित्यने तिच्या केस गळण्याचे मागे काहीतरी वाईट छायेचा हात आहे, त्यामुळे तिचेवर कोणतेही औषध काम करु शकणार नाही. दैव शक्तीच्या मदतीने तिच्या केसाचे समस्येचे निवारण करेल, त्यामुळे तिचे अॅक्टींग करीयर मध्ये कोणतीही बाधा येणार नाही, त्याचप्रमाणे तिचे करिअर वेगळ्या उचींवर जाईल, असे आमीष दाखवले होते. 

त्यानंतर  सेजल ही तिची मैत्रीण नेहा राणा सोबत  अंधेरी येथे  रहावयास जाणार होती परंतु आदित्य याने  त्या घरात  भुतप्रेत चा प्रभाव आहे, तुझ्या करीयरला ते हानिकारक होवु  शकते असे सांगुन तिला तेथे राहण्याकरीता जाण्यास परावृत्त केलेले होते. तसेच , आदित्य यांने सेजलकडुन वेळोवेळी पैसे उधार घेतले होते. तक्रारीनुसार,आदित्य याने सेजलकडुन जवळपास दीड लाख रुपये घेतल्याचे माहीत झालेले आहे. पुढे सेजलने आदित्यतला तुझे एक वर्ष ऐकून कोणताही फायदा झाला नाही. मला मुख्य भूमिका मिळाली नाही. यापूर्वी माझे सर्व सुरळीतच सुरू होते, असा सेजलने आदित्यला केलेले संदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेल्याचे तक्रारीत म्हटले आहेत.  त्यानंतर सेजल हीने आदित्यला संदेश पाठवून तिचे घेतलेले पैसे परत करणे बाबत लिहले आहे. त्यावर त्याने त्याची मोटार सायकल विकुन 15 दिवसात पैसे देत असल्याचे 'एसएमएस' मध्ये नमुद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सेजलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा