अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची वाढ

देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता.

अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची वाढ
SHARES

गँगस्टार डॉन अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली.  देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावरमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी केली. सुनावणीसाठी  अरुण गवळी मुंबईतून हजर होता.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 13 मार्च रोजी 45 दिवसांची पॅरोलची रजा दिली होती. 27 एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे  गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करत नागपूर खंडपाीठाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 10 मे पासून पुढील 14 दिवस ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

अरुण गवळीच्या धाकट्या मुलीचे 8 मे रोजी दगडी चाळीत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न पार पडले. गवळीची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेसोबत झाले आहे. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. कोरोनामुळे साध्या पद्धतीने लग्न पार पडलं.



हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा