पीएमसीतील खातेदार डाॅक्टर महिलेची आत्महत्या

मात्र काही महिन्यांपूर्वीच त्या त्यांच्या १८ महिन्याच्या बाळासह आई-वडिलांकडे येऊन रहात होत्या. त्यांची सर्व जमापुंजी ही पीएमसी बँकेत होती. बँकेते दिवाळे निघाल्यानंतर बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या. बिजलानी याच्या खात्यावर १ कोटीची रक्कम होती.

पीएमसीतील खातेदार डाॅक्टर महिलेची आत्महत्या
SHARES

पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर मागील दोन दिवसात दोन खातेदारांचा ह्रद्यविकाराने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अंधेरीच्या वर्सोवा परिसरात १ कोटी रुपये अडकलेल्या डाॅक्टर महिलेने नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. डाॅ. योगिता बिजलानी असं या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढं आलं आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर पीएमसीच्या अनेक शाखा खातेदारांना कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक खातेदारांचे पैसे अडकले. बिजलानी या पूर्वी  त्यांच्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्या त्यांच्या १८ महिन्याच्या बाळासह आई-वडिलांकडे येऊन राहत होत्या. त्यांची सर्व जमापुंजी ही पीएमसी बँकेत होती. बँकेचे दिवाळे निघाल्यानंतर बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या. बिजलानी यांच्या खात्यावर १ कोटींची रक्कम होती.

नैराश्येतून मंगळवारी रात्री बिजलानी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्या केली. मात्र बँक घोटाळ्याचा बिजलानी यांच्या आत्महत्येशी थेट संबंध आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा