सध्या पूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानादेखील मुंबईत काम करणारे कामगारांना मध्यरात्री ट्रक लपून उत्तर प्रदेशात निघाला होता. शिवडी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांकडून या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त अवैध प्रवास करणाऱ्या 59 जणांना ताब्यात घेतले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र शासनकडून खबरदारीची पावले म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु मुंबईत शहरात काम करत असलेले कामगार हे परराज्यातील असल्यामुळे कोणत्याही परीस्थितीत ते आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाकडून शहरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीत शिवडी परिसरातून अवैध रित्या कामगारांनी भरलेला एक ट्रक आणि टेम्पोतून एक कुटुंब प्रवास करत होते. नाकाबंदीत पोलिसांनी या दोन्ही वाहनांवर कारवाई केली. या दोन्ही गाड्या उत्तर प्रदेशला जात होत्या. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी दोऩ्ही चालकावर गुन्हे नोंदवत एकून 59 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात तीन महिली व चार अल्पवयीन मुलांचा ही समावेश आहे. मीरारोड आणि नवघर पोलीस ठाण्यात दोन ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र शासनकडून खबरदारीची पावले म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु मीरा-भाईंदर शहरात काम करत असलेले कामगार हे परराज्यातील असल्यामुळे कोणत्याही परीस्थितीत ते आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाकडून शहरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीत मीरारोड परिसरातून ट्रक मध्ये 32 कामगारांना घेऊन कर्नाटक येथील बिदर येथे निघालेल्या ट्रक चालकाला मीरारोड पोलिसांनी अटक केली. तर भाईंदरमधून उत्तर प्रदेशात 40 कामगारांना घेऊन जाणार्या ट्रक चालकालाही पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कामगारांना पोलिसांनी सोडले असून ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |