सालेमच्या भेटीसाठी पोर्तुगाल दुतावास तळोजा कारागृहात


सालेमच्या भेटीसाठी पोर्तुगाल दुतावास तळोजा कारागृहात
SHARES

तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात डॉन अबू सालेम यानं तळोजा कारागृहातील असुविधांबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोर्तुगाल वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तळोजा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.


वाचला तक्रारींचा पाढा

यावेळी सालेमने आपल्याला एका बंद कोठडीत ठेवण्यात आले असून कोठडीत सूर्यप्रकाश येत नाही, कोठडीत अस्वच्छता आहे, आपल्याला इतर कैद्यांप्रमाणे कुणाशीही संवाद साधण्यास दिले जात नाही,  निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जातं, फक्त शाकाहारीच जेवण दिलं जातं, अशा तक्रारींचा पाढा पोर्तुगाल दुतावासांकडे वाचला. आपल्याला पुन्हा पोर्तुगाल कारागृहात न्यावं, अशी विनंतीही सालेमनं यावेळी या अधिकाऱ्यांना केली. 

सालेमनं भारत प्रत्यार्पण कराराचा भंग करत असल्याची तक्रार पोर्तुगालमधील लिस्बन कोर्टात केली होती. त्यानुसार पोर्तुगाल दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास तळोजा कारागृहात अबू सालेमची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी अबू सालेमवर चालू असलेल्या विविध प्रकरणांमध्ये देण्यात आलेल्या निर्णयांबद्दलही चौकशी केली. त्यानंतर हे पोर्तुगाल दुतावासाचे अधिकारी महाराष्ट्र, लखनौ, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जाणार असून, अबू सालेमशी संबंधित इतर माहितीही घेणार आहेत.

फाशीची शिक्षा न देण्याची अट

११९९३ चे  बाँम्बस्फोट प्रकरण अाणि  १९९५ मधील बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून ७ वर्ष जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे. अबू सालेम तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी प्रत्यार्पण कराराचा दाखला देत आहे. सालेमला भारताच्या ताब्यात देताना पोर्तुगीज सरकारशी करार करण्यात आला अाहे. भारतामधे अबू सालेमला फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, या अटीवर त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

व्हाॅट्स अॅपमुळं सापडला अाजोबांचा ठावठिकाणा

लोन घेताना सांभाळून, नाहीतर होऊ शकते फसवणूक!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा