माहीम - वांद्रे ते माहीमदरम्यान हार्बर रेल्वेच्या प्रवासादरम्यानची ही दृष्य...
युनिफॉर्मवरून महापालिकेच्या शाळेतले वाटणारे हे विद्यार्थी पहा...
हे डब्याच्या दरवाज्यात लटकत नसून इंजिन रूमच्या दरवाज्यातच त्यांची स्टंटबाजी सुरू आहे...
सिग्नलवर थाप...
खांबांवर थाप...
उड्या मारून जणू काही देवळातली घंटाच वाजवण्याच्या आविर्भावात सुरू असलेल्या या स्टंटबाजीवर कोणाचेच लक्ष नाही...
ब्रीजच्या भिंतीवर पाय घासताना, खाडीवरून जाता जीवाची पर्वाच नाही हे दाखवून देत असलेल्या या मुलांच्या पालकांना याची थोडीतरी कल्पना असेल का ?
बरं, स्टेशनवर उतरतील तर स्टंट कसा वाटणार? म्हणून स्टेशनच्या उलट्या बाजूला तेही गाडी थांबण्यापूर्वीच ही जोडगोळी उड्या मारून पसार झाली. डबे रिकामे असतानाही कुणी ओरडायला नको म्हणून इंजिन रूमच्या दरवाजात लटकणाऱ्या या छोट्या उस्तादांना आवरायचं तरी कुणी? रेल्वे पोलिसांनी तरी कुठं कुठं लक्ष ठेवायचं असा प्रश्न आता पडतोय...