अंधेरी - लाच मागितल्याप्रकरणी अंधेरी पश्चिमेकडील गिलबर्ट हिल रोड इथल्या 25 'ड'चे शिधावाटप अधिकारी अविनाश काशिराम पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय.
शिधावाटप दुकानातील स्टॉक रजिस्टरमध्ये त्रूटी न काढण्यासाठी प्रति महिना रुपये 4 हजार प्रमाणे तीन महिन्यांचे 12 हजार रुपये आणि दिवाळीचे 3 हजार असे एकूण 15 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर 22 नोव्हेंबरला शिधावाटप कार्यालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी अविनाश पाटील याला रंगेहात पकडले.