मुंबई पोलिसांनी आज (१३ डिसेंबर) आज सकाळी रिपब्लिक टीवीचे सीईओ (Republic TV CEO) विकास खानचंदानी (Vikas Khanchandani) याला अटक केली आहे. दरम्यान ही कारवाई कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी असल्याचं सांगितलं जात आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये काही चॅनल्स कडून टीआरपी साठी गैर प्रकार केले जात असल्याची गोष्ट समोर आली होती. Broadcast Audience Research Council (BARC)कडून तक्रार करण्यात आली होती. त्यांनी हंसा रिसर्च ग्रुपच्या तक्रारीवरून आरोप केल्यानुसार काही चॅनल टीआरपीच्या अंकांमध्ये छेडचाड करत असल्याचं म्हटलं होतं.
मुंबई पोलिसांकडून टीआरपी घोटाळा प्रकरणी १२ जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले होते. रिपब्लिक टीव्ही ने टीआरपी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी देखील याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत. मागील आठवड्यात त्यांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती.
यापूर्वी रिपब्लिक टीवीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंह यांना यापूर्वी कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी अटक केली होती. मजिस्ट्रेट ने घनश्याम सिंह यांना १३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यानंतर ५डिसेंबरला त्यांना जामीनावर सोडण्यात आले आहे.