टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, आरपीएफ जवानाला अटक

टॅक्सी चालकाने जाण्यास नकार दिल्याच्या रागातून जवानाने चालकावर अनैसर्गिक अत्याचार केले.

टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, आरपीएफ जवानाला अटक
SHARES

टॅक्सी चालकाने ग्रँटरोड इथं जाण्यास नकार दिल्याच्या रागातून एका आरपीएफ जवानाने या टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी आरपीएफ जवानाला अटक केली आहे. अमित धानकड असं या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबईच्या सीएसटी इथं अमित हा ११ जानेवारीच्या रात्री कार्यरत होता. रात्रपाळी संपल्यानंतर तो स्थानकाबाहेर आला. त्यावेळी पी. डीमेलो मार्गावरील एका बाकड्यावर एक टॅक्सी चालक झोपला होता. अमितने त्याला उठवून टॅक्सीने ग्रँटरोड येथील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या परिसरात सोडण्यास सांगितलं. मात्र टॅक्सी चालकाने त्यास नकार दिला. त्यावरून अमितने त्या टॅक्सी चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसंच त्याला जबरदस्ती रेल्वे परिसरातील निर्जन स्थळी नेत त्याच्या गाडीची चावी आणि खिशातील पैसे काढून घेतले.

एवढ्यावरच न थांबता अमितने टॅक्सी चालकाला धमकावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी टॅक्सी चालकाने माता रमाबाई मार्ग पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अमितला ३७७, ३९४,३४१,३२४,५०४,५०६(२) भा.द.वि कलमांतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा