बोहरी समुदायाची सूत्र कोणाकडे जाणार? यावरून सुरु असलेल्या खटल्यात शुक्रवारी उच्च न्यायलयात ताहेर फक्रुद्दीन यांच्या जाबाबी नोंदवण्यास सुरवात झाली. ताहेर फक्रुद्दीन यांनी दावा केला आहे की ते बोहरी समुदायाचे प्रमुख असून त्यांना सय्यदना म्हणून घोषित करण्यात यावे.
२०१४ साली वयाच्या १०२ वर्षी बोहरी समुदायाचे अध्यात्मिक गुरु सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात बुऱ्हानुद्दीन यांचे दुसरे सुपुत्र मुफाद्दल सैफुद्दीन यांच्याकडे बोहरी समुदायाची सूत्रे जाऊन त्यांना 'सय्यदना' म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, हा आपला हक्क असल्याचा दावा करत बुऱ्हानुद्दीनचे भाऊ खुजैमा कुतबुद्दीन यांनी करत कोर्टात धाव घेतली होती.
२०१६ साली कुतबुद्दीन यांचा मृत्यू झाला. कुतबुद्दीन यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फक्रुद्दीनने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. कोर्टाने कुतबुद्दीनच्या जागी फक्रुद्दीनच्या नावाला संमती देत खटला पुढे सुरु ठेवला होता.
फक्रुद्दीनने दावा केला आहे, की त्याच्या वडिलांनी मारण्यापूर्वी आपल्याला 'सय्यदना' म्हणून घोषित केले होते. कोर्टाने पुतण्या सैफुद्दीनला 'सय्यदना' म्हणून काम करण्यास मज्जाव करण्याची मागणी कुतबुद्दीन यांनी केली होती. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या खटल्याप्रमाणे सय्यदना बुऱ्हानुद्दीन यांनी ५० वर्षांपूर्वी कुतबुद्दीन यांची मझून (उप-डेप्युटी) तसेच त्यांचा उत्तराधिकारी म्हणून गुप्तपणे निवड केली होती. फक्रुद्दीनने तो बोहरी समुदायाचा ५३वा दाई अल-मुतलाक (अध्यात्मिक गुरु) असल्याचा दावा केला आहे.
शुक्रवारी न्यायाधीश गौतमी पटेल यांनी फक्रुद्दीनचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जबाब नोंदवल्यानंतर सैफुद्दीनचे वकील त्याची उलट तपासणी करतील.