सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण: महेश भट्ट, करण जोहर आणि कंगनाला पोलिस चौकशीला बोलवणार- गृहमंत्री

पोलिसांना या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची चौकशी करावीशी वाटेल. त्या सर्वांना चौकशीला बोलवणार असून दिग्दर्शक महेश भट्ट, करण जोहर आणि कंगन्ना यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे. लवकरच त्यांची देखील पोलिस चौकशी ही चौकशी होईल.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण: महेश भट्ट, करण जोहर आणि कंगनाला पोलिस चौकशीला बोलवणार- गृहमंत्री
SHARES

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस आता दिग्दर्शक महेश भट्ट, करण जोहर आणि अभिनेत्री कंगना रनौअतला चौकशीला बोलवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. या प्रकऱणी आतापर्यंत ३७ हून जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचाः- सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल

सुशांत सिंग राजपूतचा 'दिल बेचारा' नुकताच रिलीज झाला. सुशांत सिंगने आत्महत्या करून आता पंधरा ते वीस दिवस ओलांडले मात्र त्याच्या आत्महत्येमागील गूढ अद्यापही गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३७हून अधिक जणांची चौकशी केली असली, तरी पोलिसांच्या हाथी अद्याप ठोकस असं काही लागलेलं नाही. दरम्यान सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी गुरूवारी लेखक व दिग्दर्शक रूमी जाफरीला बोलावले होते. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासून मुंबई पोलिस त्याच्या आत्महत्या करण्या मागचे कारण तपासण्यात गुंतले आहेत. या तपासासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत तीन डझनहून अधिक लोकांचे जबाब नोंदविली आहेत. यामध्ये रिया चक्रवर्ती, चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, मूल्य दिग्दर्शक मुकेश छाबरा, आदित्य चोपडा, डॉ. केर्सी चवडा, राजीव मसंद, लेखर रूमी जाफरी आणि सुशांत यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्यात आता पोलिसांनी दिग्दर्शक महेश भट्ट, करण जोहर आणि अभिनेत्री कंगना रनौअत यांनाही समन्स बजावले आहे.

हेही वाचाः- अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमानच्या वडिलांचे प्रत्युत्तर

सुशांतच्या आत्महत्येमागे बाॅलीवूडमधील घराणेशाहीचा हात असल्याचे बोलले जात होते. त्यातूनच सोशल मिडियावर सुशांतला न्याय देण्यासाठी एक ट्रेड  सुरू आहे. याबाबत बोलताना गृहमंत्र्यांनी पोलिसांना या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची चौकशी करावीशी वाटेल. त्या सर्वांना चौकशीला बोलवणार असून  दिग्दर्शक महेश भट्ट, करण जोहर आणि कंगन्ना यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे. लवकरच त्यांची देखील पोलिस चौकशी होईल दरम्यान प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान ही अशा प्रसंगाला बळी पडल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. रेहमानला या साठी चित्रपट मिळत नाहीत कारण ते सर्व समोरून येत असलेले चित्रपट स्विकारत नाही. ते फक्त सिलेक्टिव लोकांसोबतच काम करतात. पण हि माहिती खरी की खोटी हे कुणालाच माहित नाही. मात्र सध्या या अफवेची बाँलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा