मुलुंडमधील मसाले व्यापाऱ्याच्या मुलाचे सिनेस्टाइल अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

संबंधित लोक विरलकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने आपल्याकडे पैसे नाहीत. पैसे आल्यानंतर देतो असं विरल सांगत होता.

मुलुंडमधील मसाले व्यापाऱ्याच्या मुलाचे सिनेस्टाइल अपहरण, पुण्यातून चौघांना अटक
SHARES

दिलेले पैसे परत न केल्याच्या रागातून मुलुंडमधील मसाले व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या ४ आरोपींना मुलुंड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. रोहित बाबासाहेब घारे, महेश नारायण जोंधळे, रोहन कुमार गराडे आणि आकाश लक्ष्मण करंजावणे अशी या आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- सीईटी अर्ज प्रक्रियेला २ दिवसांची मुदतवाढ

मुलुंड परिसरात राजेश लालन यांचा वडिलोपार्जित मसाल्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी राजेश यांचा मुलगा विरल याने कापड व्यवसाय सुरूकेला. मात्र, विरल याने कापड व्यवसायात मार्केटिंगचे काम करणारे रोहित बाबासाहेब घारे, महेश नारायण जोंधळे, रोहन कुमार गराडे आणि आकाश लक्ष्मण करंजावणे यांच्याकडून ५ लाख रुपये उधार घेतले होते. संबंधित लोक विरलकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने आपल्याकडे पैसे नाहीत. पैसे आल्यानंतर देतो असं विरल सांगत होता. मात्र, आरोपी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे चारही जणांनी विरल याच्याच अपहरणाचा कट रचला. विरल याचं अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून पैसे मागण्याचा प्लान आरोपींनी केला.

हेही वाचाः- मुंबईतील लोकल ट्रेन, कार्यालयं १ नोव्हेंबरपासून सुरू करा, महापालिकेकडे अहवाल सादर

आरोपी रोहित आणि महेशने विरल याला अंधेरीला कामानिमित्त बोलावून घेतलं. त्याला गाडीत टाकून पुण्याच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे ही कार अपहृत विरल याचीच होती. पुण्याला जात असताना रस्त्यात त्यांना रोहन आणि आकाश हे दोघे भेटले. त्यांनी विरलचे वडील राजेश लालन यांना फोन करून पैसे देण्याची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर मुलाला मारून टाकण्याची धमकीही दिली. धमकीचा फोन येताच राजेश यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेतली. उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार करून तांत्रिक माहितीच्या मदतीनं या आरोपींचा पाठलाग सुरू केला. आरोपींचे मोबाइल लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. पोलिसांनी ऐनवेळी आरोपींच्या मुस्क्या आवळून विरलची सुटका केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा