शिवसेना नेते नितीन नांदगावकरांना धमकीचा फोन

समोरील व्यक्तीने नांदगावकर यांना शिवीगाळ केली. ऐवढ्यावरच तो थांबला नाही. तर ‘तुम्हारे साथ क्या होगा समझ जाओगे’ अशीही धमकी दिली.

शिवसेना नेते नितीन नांदगावकरांना धमकीचा फोन
SHARES

भूमिपूत्रांसह गरीबांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे शिवसेना नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar ) यांना सोमवारी अज्ञात नंबरहून फोन करून धमकी देण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी नांदगावकर यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वीच एका रिक्षा चालकाला अवाजवी रक्कम आकारल्या प्रकरणी नांदगावकर यांनी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयातील (Hiranandani Hospital ) प्रशासनाला धारेवर धरले होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


शिवसेनेचे डँशिंग नेते म्हणून ओळख असलेले नितीन नांदगावकर हे कायम गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवतात.  त्यांच्या या स्टाईलचे महाराष्ट्रात लाखो दिवाणे आहेत. नुकताच नांदगावकरांनी एका रिक्षा चालकाला न्याल मिळवून दिला.  या रिक्षा चालकाला रुग्णालय प्रशासनाने ८ लाखांचे बिल पाठवले. ही तक्रार घेऊन रिक्षा चालक नितीन नांदगावकर यांच्याजवळ गेला असता. नांदगावकरांनी १७ जुलै रोजी पवई (Powai )चे हिरानंदानी रुग्णालय गाठले. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ  डाँ सुजित चटर्जी यांना या प्रकरणाविरोधात जाब विचारला. त्यावेळी चटर्जी यांनी दम देत पैसे भरा आणि मृतदेह घेऊन जा अशी धमकी दिल्याचा आरोप नांदगावकर यांनी केला.  दरम्यान  नांदगावकर यांनी  ‘मी त्यांना एकही रुपया भरणार नाही व मृतदेह घेऊन जाणार नाही’ असे सांगून रिक्षा चालकाचा मृतदेह घेऊन आलो. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्या अंगावर धावून येण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचाः- मुंबईत ४४३ अतिधोकादायक इमारती, तोडगा काढणारच- किशोरी पेडणेकर

दरम्यान  २० जुलै रोजी म्हणजेच सोमवारी सकाळी ११.१७ च्या सुमारास नांदगावकर यांना ९९६७१९९३३३ या क्रमांकावरुन फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने नांदगावकर यांना धमकी देत शिवीगाळ केली. ऐवढ्यावरच तो थांबला नाही. तर ‘तुम्हारे साथ क्या होगा समझ जाओगे’ अशीही धमकी दिली. या प्रकरणी नांदगावकर यांनी नेहरूनगर (Nehru Nagar ) पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा