लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईच नाही, तर राज्यभरातील भाविकांची गर्दी उसळते. गर्दी म्हटलं की पाकिटमार, भुरट्या चोरांसाठी सुवर्णसंधीच. याच संधीचा फायदा घेत यावर्षी कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही २५४ भाविकांचे माेबाईल फोन आणि ६९ पाकिटांवर चोरट्यांनी 'हात साफ' केला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी १२ चोरट्यांना अटक देखील केली आहे.
गणपती विसर्जनच्या दिवशी लालबाग परिसरात तुफान गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी २५४ मोबाईल, ६९ पाकिटे आणि सोन्याची चेन चोरल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलिसांत नोंदविण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच दिवशी १२ चोरांच्या तीन टोळीला अटक करून त्यांच्याकडून ३० मोबाईल मिळवले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रमझान अंसारी, शेख फारूक आलम, नियाज अहमद, मुबारक अली, हाफिज उर रेहमान, अक्रम अंसारी यांच्या टोळीचा समावेश आहे. या टोळीसह समीर सईद मिर्जा, सोनू कुंदन ससाणे, अब्दुल रेहमान मोहम्मद शाह कादरी तसेच अशफाक सलीम शेख आणि झुबेद शेख अशा तीन टोळ्यांना अटक केली आहे. हे सगळे आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून या तिन्ही टोळ्या मुंबई परिसरातील असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
लालबाग परिसरात विसर्जनच्या दिवशी मोठी गर्दी होत असल्यानं चोरांच्या टोळ्या जाणीवपूर्वक भाविकांना लक्ष्य करतात. गेल्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी ५०० चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)