अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर असताना, आता त्याचे वडील सलीम खान यांना एका बुरखाधारी महिलेने धमकी दिली आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान सलीम खान यांना एका अनोळखी महिलेने ‘मी लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?,’ अशी धमकी दिली. त्यानंतर या महिलेला आणि तिच्यासोबत स्कुटीवर असलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
सलीम खान हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटच्या बाहेर आले असताना, स्कूटरवरून आलेल्या महिलेने सलीम खान यांना गाठले आणि ‘लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?,’ अशी धमकी देत तेथून पळ काढला.
महिलेने बुरखा घातला असल्याने तिची ओळख पटली नाही. यानंतर या अनोळखी महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
महिलेसह दोघांना अटक
याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. स्कुटी चालवणाऱ्या इसमालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सलमानच्या सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न
मेहबूब स्टुडिओ येथून वांद्रे येथील घरी जाताना बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षा ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा