शिवाजीनगर - रिक्षाला लागलेल्या आगीत होरपळलेल्या दोन महिन्यांच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. तुबा कुरेशी असे या चिमुरडीचे नाव आहे. रविवारी रात्री गोवंडी शिवाजीनगर परिसरात रिक्षाला आग लागून हा अपघात झाला होता.
'रिक्षामधील सीएनजी लिकेज झाल्याने ही आग लागली होती. याबाबत तपास करून रिक्षा चालकांवर योग्य कारवाई करण्यात येईल', अशी माहिती झोन सहा चे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.