एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पस येथील वसतिगृहाच्या वाॅर्डनने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीनं केला होता. या प्रकरणी वसतिगृहाच्या वॉर्डनला तीन दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून तिला कॅम्पसमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एसएनडीटी विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात मुलींना स्लिव्हलेस कपडे घालण्यास मनाई आहे. परंतु
एसएनडीटीमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने तोकडे आणि स्लिव्हलेस कपडे घातले होते. मात्र आपल्या अंगावर रॅशेस आल्याने हे कपडे घातल्याचं तिने वाॅर्डनला सांगितलं. रचना झवेरी असं या वॉर्डनचं नाव असून अंगावर आलेले रॅशेस पाहण्यासाठी वाॅर्डननं आपल्याला कपडे काढायला लावल्याचा आरोप या मुलीनं केला होता.
या प्रकाराविरुद्ध संतप्त विद्यार्थिनींनी याठिकाणी आंदोलन सुरू केलं असून या वाॅर्डनला कामावरून काढण्याची मागणी केली आहे. तसच या विद्यार्थिनीनं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. काही विद्यार्थिनींनी निदर्शन केल्यानं या ठिकाणी तणावाचं वातावरण पसरलं होत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वॉर्डन रचना झवेरी यांना तीन दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून कॅम्समध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसचं विद्यापीठ प्रशासनातर्फे चौकशी समिती नेमली असून त्यात मॅनजमेंट काऊन्सिलचाही सहभाग असणार आहे. ही चौकशी समिती तीन दिवसामध्ये आपला अहवाल विद्यापीठाकडं देणार आहे.
हेही वाचा -