अशोकनगर - भांडुपच्या अशोकनगर परिसरात राहणारा २५ वर्षीय तेजस वायंगणकर हा तरूण बेपत्ता आहे. 22 सप्टेंबरला तेजस घरातून बाहेर गेला होता. पण तो पुन्हा परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबियांनी कांजुरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात तेजसचे मोबाईल लोकेशन शिर्डीमध्ये सापडले आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याचे तेजसचे नातेवाईक अतुल मळेकर यांनी सांगितले.