Advertisement

११वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत 'इतक्या' विद्यार्थ्यांनी नाकारलं महाविद्यालय

११वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळूनही मुंबई महानगर परिसरातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.

११वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत 'इतक्या' विद्यार्थ्यांनी नाकारलं महाविद्यालय
SHARES

११वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळूनही मुंबई महानगर परिसरातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दुसऱ्या प्रवेश फेरीत २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली असून, या फेरीसाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा रिक्त आहेत. ११वीच्या दुसऱ्या फेरीतही हजारो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेण्यास नकार दिला आहे.

यंदा १०वीचा निकाल चढा असल्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण वाढले. दुसऱ्या फेरीत मराठा आरक्षण लागू न करता विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्यात आलं. त्यामुळं ही पात्रता गुणांमध्ये बदल झाले. त्यामुळं हवे ते महाविद्यालय मिळण्याच्या प्रतीक्षेत अद्यापही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही.

दुसऱ्या प्रवेश फेरीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी ३१ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली होती. मात्र त्यापैकी अवघ्या २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. संमती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी संपर्क साधूनही त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला. दरम्यान गुरुवारपासून तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली असून, या फेरीसाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा रिक्त आहेत.

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा

  • कला – १४ हजार ५५७, 
  • वाणिज्य – ६३ हजार ३५९
  • विज्ञान – ३८ हजार ८६९
  • किमान कौशल्याधारित अभ्यासक्रम – २ हजार ७९६
  • एकूण – १ लाख १९ हजार ५८१

आतापर्यंत झालेले प्रवेश

  • कला – १२ हजार ५३३
  • वाणिज्य -६३ हजार २४८
  • विज्ञान – ३९ हजार १३
  • किमान कौशल्याधारित अभ्यासक्रम – १ हजार ३३४
  • एकूण – १ लाख १६ हजार १२८
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा