Advertisement

दहावीचा निकाल जाहीर, ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन आणि नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात येऊ निकाल जाहीर करण्यात आला.

दहावीचा निकाल जाहीर, ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
SHARES

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदा एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. 

कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन आणि नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात येऊ निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. परिक्षेसाठी एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही, असे मंडळाने कळवले आहे. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये 

- कोकण विभागाचा १०० टक्के निकाल

- ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

- नागपूरचा निकाल सर्वात कमी

- राज्यात ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी

विभागनिहाय टक्केवारी

कोकण - १०० टक्के

पुणे- ९९.९६ टक्के

नागपूर - ९९.८४ टक्के

औरंगाबाद - ९९.९६ टक्के

मुंबई- ९९.९६ टक्के

कोल्हापूर -९९.९२ टक्के

अमरावती - ९९.९८ टक्के

नाशिक - ९९.९६ टक्के

लातूर - ९९.९६ टक्के

पुढील लिंकवर निकाल उपलब्ध 

http://result.mh-ssc.ac.in

www.mahahsscboard.in



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा