मुंबई महापालिकेनं १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १ली ते ७वीच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्तांच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. यानंतर मुंबई महापालिकेनं १५ दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारनं बुधवार १ डिसेंबरपासून राज्यातील १लीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, क्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ डिसेंबरपासून सुरू केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांच्या परवागीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळं शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झाला.
१ली ते ७वीच्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना