Advertisement

शिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूद


शिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूद
SHARES

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला आहे. यंदा पालिकेच्या शिक्षण विभागासाठी २ हजार ७३३.७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना हा अर्थसकल्प सादर केला. अर्थसंकल्पात पालिका शाळांमध्ये आधुनिक सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.


महत्त्वाचे मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्यासाठी २.६० कोटींची तरतूद
  • भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी १.३० कोटी खर्चून भाषा प्रयोगशाळेची उभारणी करणार
  • टिंकर लॅबसाठी (थ्रीडी डिझाईन, प्रिटींग इलेक्ट्रॉनिक रोबोट बनविणे, मोबाइल अॅप विकसित करणे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातील) १.४२ कोटींची तरतूद
  • नाबेट संस्थेद्वारे पालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी २० लाखा
  • विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन सेवा देण्यासाठी १ कोटी
  • पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी विज्ञान कुतूहल भवन उभारले जाणार असून यासाठी १.२० कोट
  • विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्यासाठी १९.६० कोटींची तरतूद. यामध्ये गणवेश, बूट, दप्तर, वह्या, रेनकोटसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार. तर इतर वस्तूंची रक्कम अनुदान स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार
  • खेळांच्या साधनासाठी २ कोटींची तरतूद
  • शाळांमधील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी २४.३० कोटी रुपयांची तरतूद
  • ई-लायब्ररी - १.३० कोटी
  • डिजीटल क्लासरुम - प्राथमिक - ५.३३ कोटी, माध्यमिक - २.९१ कोटी
  • टॉय लायब्ररी - ७.३८ कोटी
  • मिनी सायन्स सेंटर्स - ६६ लाख
  • महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ठ रंगांद्वारे होणार, महापालिका शाळांना विशिष्ठ ओळख प्राप्त व्हावी यासाठी तपकिरी - पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी होणार, यासाठी २०१.७३ कोटींची तरतूद
  • दिव्यांग विद्यार्थी-पालक उपस्थिती भत्ता - ३.८ कोटी
  • व्हर्च्युअल क्लासरुम - व्हिटीसीद्वारे तज्ज्ञ शिक्षकांचे व्याख्याने आयोजित केले जाणार : प्राथमिक - १०.४४ कोटी, माध्यमिक - ६.४८ कोटी
  • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन
  • शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार. ही सहल राजमाता जिजामाता उद्यानात पेंग्विन बघायला जाणार



हेही वाचा - 

मुंबईकरांना दिलासा; अर्थसंकल्पात कुठलीच करवाढ नाही




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा