Advertisement

आता मनपा शाळा होणार अत्याधुनिक


आता मनपा शाळा होणार अत्याधुनिक
SHARES

मनपाच्या 480 शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने म्हणजेच (व्हर्च्यूअल क्लास रुम) पद्धतीने शिक्षण दिले जाते. इंटरनेटच्या वाढलेल्या वेगामुळे आता इंटरनेटचा वापर कलासरूममध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मनपा शाळेतील शिक्षण वेगवान होईल. याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी घर बसल्या लेक्चर अटेंड करू शकतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून अशा 202 शाळा नव्याने सुरू करण्यात येतील. यासाठी अंदाजे 21 कोटी 84 लाखांची तरतुदी करण्यात आली आहे.

मनपा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लास रुमची सुरुवात 2011 मध्ये करण्यात आली. त्यावेळी केवळ 24 शाळांचा समावेश होता. आता 480 शाळांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. 480 शाळांपैकी 188 मराठी शाळा, 150 हिंदी, 90 उर्दू, आणि 52 इंग्रजी शाळांचा समावेश आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा