केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं (CBSE) यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. सीबीएसईनं २०२०-२०२१ सत्राच्या ९ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम (syllabus) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ANI ला यासंदर्भात माहिती दिली. शिकण्याचं (Education news) महत्त्व लक्षात घेऊन CBSE अभ्यासक्रमात मूळ संकल्पना राखून ३०% पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेः केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल, असं ट्विट ANI नं केलं आहे.
Considering the importance of learning achievement, it has been decided to rationalize CBSE syllabus up to 30% by retaining the core concepts: Dr. Ramesh Pokhriyal, Union Minister for Human Resource Development pic.twitter.com/CBCHsW5o9F
— ANI (@ANI) July 7, 2020
विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीनं हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीनं घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन देखील याबाबत माहिती दिली.
“देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबीएसईला ९ वी ते १२ इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता” असं ट्विट काही दिवसांपूर्वी डॉ. रमेश पोखरीयाल यांनी केलं होतं.
याशिवाय ते हे देखील म्हणाले की, कोरोना (coronavirus update) आणि लॉकडाऊनमुळे वेळ आणि अभ्यासाचे झालेले नुकसान पाहता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटानंतर अभ्यासक्रम कसा असावा याबाबत जनतेला विचारणा करण्यात आली होती. यावेळी एक लाखांहून अधिक जणांनी सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा