Advertisement

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आधी सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ राज्य सरकार व आयसीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्या.

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. 

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या धनंजय कुलकर्णी यांनीच ही याचिका दाखल केली आहे. दहावीची परीक्षा घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अकरावीसाठी सीईटी घेता येत असेल तर दहावीच्या परीक्षा सरकारला का घेता येत नाही असा आक्षेप कुलकर्णी यांनी घेतला आहे. या याचिकेवर सोमवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आधी सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ राज्य सरकार व आयसीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्या.  या निर्णयाला पुण्याचे रहिवासी  व प्राध्यापक असलेले धनंजय कुलकर्णी यांनी ॲड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

एसएससी, आयसीएसई, सीबीएसई अशा वेगवेगळ्या बोर्डांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल वेगवेगळ्या फॉर्म्युलाने लावले तर आणखी गोंधळ वाढेल, डिप्लोमाच्या विविध कोर्सच्या प्रवेशातही गोंधळ होईल. एसएससी बोर्डने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीची घोषणा केली असेल तर दहावीची परीक्षा घेणेही शक्य आहे. इतर बोर्डांनी बारावीची परीक्षा घेण्याचे ठरवले असेल तर दहावीची परीक्षाही शक्य आहे. याप्रश्नी न्यायालयाने हस्तक्षेप करावा आणि परीक्षा रद्द करण्याचे बोर्डांचे निर्णय रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 



हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा